BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Saudagar : अनधिकृत पत्राशेडवर हातोडा, मोशीतील अनधिकृत बांधकाम भुईसपाट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पिंपळेसौदागर येथील अनधिकृत पत्राशेडवर हातोडा चालविला. पाच पत्राशेड काढण्यात आल्या तर, 41 जणांनी स्वत:हून अनधिकृत पत्राशेड काढले. तसेच मोशीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

पिंपळेसौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत गोविंद गार्डन जवळ कारवाई करण्यात आली. पत्राशेडचे बांधकामाचे क्षेत्रफळ अंदाजे 600 चौरस फुट होते. अंदाजे 5000 चौरस फुट पत्राशेड संबंधित धारकांनी स्वत:हून काढून घेतले. दरम्यान, वडमुखवाडी, मोशीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

एक जेसीबी, एक ट्रक तसेच 10 मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like