Pimple Saudagar News: पिंपळेसौदागर येथील विकासकामांची आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 28 पिंपळेसौदागरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (सोमवारी) पाहणी केली. नगरसेवक नाना काटे यावेळी उपस्थित होते.

पिंपळेसौदागर येथील आरक्षण क्रमांक 351 मधील योगा पार्क उद्यान, 18 मीटर कुणाल आयकॅान रोड, तसेच मिलिटरीचा 18 मीटर रस्ता आदी विकास कामांची पाहणी करण्यात आली. कुंजीर चौक येथे मिलिटरी रोड व कुणाल आयकॉन रोड यांना जोडण्यात येणाऱ्या लिंक रस्त्याची जागा संबंधित जागा मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी.

तसेच तिथे काम सुरू करावे. त्यामुळे कुणाल आयकॉन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न लवकर सुटेल. तसेच पिंपळे सौदागरमधील इतर ताब्यात नसलेलया डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधित जागा मालाकांशी प्रत्यक्ष भेटून संबंधित अधिकारी यांनी बैठक घेऊन त्यांना योग्य तो मोबदला लवकर द्यावा. रस्ते विकसित करावा, अशी सूचना नगरसेवक नाना काटे यांनी केली.

त्यावर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच डीपी रस्त्याबाबत बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी केल्या.

स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर अशोक भालकर, उपअभियंता मनोज सेठिया, केशव लावंड, टी.के चव्हाण, स्थापत्य विभागाचे शाखा अभियंता नरेश जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.