Pune Crime News : इंग्लंडमध्ये नोकरी मिळवून देण्याचा आमिषाने उच्चशिक्षित तरुणाची साडेचार लाखांनी फसवणूक

एमपीसी न्यूज – पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला इंग्लंडमध्ये मॅनेजर पदावर नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून सायबर चोरट्यानी 4 लाख 67 हजार रुपयांचा गंडा घातला. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण 30 वर्षे वयाचा आहे. ऑनलाइन पद्धतीने नोकरी शोधत असताना त्याला फेब्रुवारी महिन्यात FR Sladesdown farm या कंपनीच्या नावाने मेल आला. या कंपनीत इंग्लंडमध्ये स्टोअर मॅनेजर पदावर नोकरी लावून देतो असे सांगितले होते. त्यानंतर या कंपनीच्या वतीने संवाद साधणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आणि इंग्लंडमध्ये जाण्यासाठी विजा प्रोसिजर आणि इतर कारणासाठी वेळोवेळी फिर्यादीला एका बँक खात्यात 4 लाख 67 हजार 200 रुपये भरण्यास भाग पाडले.

परंतु इतके पैसे भरूनही नोकरी मिळत नसल्यामुळे फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पोलिसात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार करून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.