BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमधील शिवसृष्टीचे आमदार जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

84
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर येथे लवकरच ‘शिवसृष्टी’ साकारणार आहे. या शिवसृष्टीच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

स्मशानभूमी जवळील परघळे कॉर्नर येथील आरक्षण क्र.362 मधील आरक्षित असलेले 1 एकर क्षेत्रातील विकसित करावयाचे स्केटिंग ग्राऊंड, वॉचमेन हाऊस, टॉयलेट ब्लॉक, चेंजिंग रूम या सोबत सदर मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे ‘शिवसृष्टी शिल्प’ साकारण्यात येणार आहे.

यावेळी पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सामाजिक कार्यकर्त्या चंदा भिसे, कॉन्ट्रॅक्टर एस.एस.साठे, प्राजक्ता झिंजुर्डे, भारती जाचक, शीतल झिंजुर्डे, भानुदास काटे पाटील, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, अर्जुन काटे, हेमराज कवडे, शेखर कुटे, जगन्नाथ काटे, दत्तोबा काटे, प्रकाश झिंजुर्डे, संजय कुटे, मैत्राजी, विजय काटे, अजय कदम, निलेश कुंजीर, महेंद्र झिंजुर्डे, रोहिदास नवले, प्रवीण कुंजीर, बाळासाहेब परघळे, सतीश परघळे, गणेश झिंजुर्डे, समीर देवरे, दीपक गांगुर्डे, संजय भिसे, कैलास काटे, काळुराम झिंजुर्डे, विकास काटे, सतीश काटे, श्रीपाद काटे पाटील आदी उपस्थित होते.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3