Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर कारवाई करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे महावितरणचा (Pimple Saudagar) हलगर्जीपणामुळे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा घेतला मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली. तसेच मेंढपाळास नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.

पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॅालनी गावठाण बीआरटीएस मार्गा लगत मेंढपाळ शेळ्यांचा कळप घेऊन  जाताना रस्त्यालगत असणाऱ्या महावितरणचा डी.पी बॅाक्स मधील वायरचा शॅाक लागून तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. मेंढपाळाच्या माहितीनुसार सर्वांत प्रथम एक बकरी त्या डीपी बॅाक्स जवळ जाऊन कोसळली.

त्याला वाटले तीला चक्कर आली असेल. त्यामुळे मेंढपाळ त्या शेळीला पाहण्यासाठी जवळ गेला असता त्याला सुद्धा वीजेचा धक्का बसला व तो बाजूला फेकला गेला.

FC Road : पुण्यातील FC रोडवरील वैशाली हॉटेलसह इतर दुकानावर अनधिकृत बांधकाम विभागाची कारवाई

सुदैवाने नशिब बलवत्तर म्हणून मेंढपाळाचा या दुर्घटनेत जीव वाचला. परंतु, पुन्हा त्याजागी त्याच कळपातील आणखी दोन शेळ्या गेल्या व मेंढपाळाच्या डोळ्यांसमोर त्यांचा देखील विजेचा धक्का लागून  जीव गेला.

यात महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे 3 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही (Pimple Saudagar) बातमी कळताच काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थाळी भेट देऊन  हलगर्जीपणा करणा-या महावितरणच्या कर्मचारी, ठेकेदार, यांच्यावर कारवाई करावी तसेच त्या मेंढपाळास झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा सुचना संबधीत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांना केल्या.

डीपी बॅाक्स बदलून नविन डीपी बॅाक्स बसविण्यात यावा. विश्वशांती कॅालनी गावठाण मधील महावितरणची वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खाबांवरून असणा-या वायर या अंडरग्राउड कराव्या अशा देखील सुचना संबधित महावितरण विभागास काटे यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.