Pune : वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी चालकांवर कारवाई करणारे तीन पोलिस निलंबित

एमपीसी न्यूज – वाहतूक कोंडी झालेली असताना त्याचे नियमन न करता वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पुण्यातील (Pune) डेक्कन वाहतूक विभागातील तीन पोलिस हवालदारांचे निलंबन झाले आहे.

Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर कारवाई करा – नाना काटे

डेक्कन वाहतूक विभागातील पोलिस हवालदार जितेंद्र दत्तात्रेय भागवत, जयसिंग यशवंत बोराणे आणि गोरख मारुती शिंदे अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

कर्तव्यावर असताना गैरवर्तन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीच्या वेळी तिघेजण एकत्र येऊन एकाच ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.