Pimplegurav : वाहतूक नियमांचे पालन करावे, असा संदेश देत केला वाढदिवस साजरा

साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड शहर संस्थांचे अध्यक्ष सुरेश कंक यांचा अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड शहर या संस्थांचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी कृतीशील कार्यक्रम करीत आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, निशिकांत गुमास्ते,कार्यवाह मधूश्री ओव्हाळ, कवयित्री संगीता झिंजूरके, अरुण परदेशी, उमेश सणस, दिलीप ओव्हाळ, प्रथमेश जगदाळे हे कार्यकर्ते उपस्थित होते.

मानवी जीवन अमूल्य आहे. म्हणूनच आयुर्वेद आणि विज्ञान विविध आजारांवर अहोरात्र संशोधन करीत आहे. चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांनी रस्ते फुलले आहेत. वाहतूक नियमांचे पालन करा. दिशादर्शक दिवे पाहून वाहने चालवा. आपली घरी कोणी तरी वाट पाहतेय, याची सदैव जाणीव ठेवा. जीवाला जपा, हा संदेश सुरेश कंक यांनी आपल्या पोशाखावर रंगीत घोषवाक्ये लिहून आपला वाढदिवस साजरा साजरा केला.

  • सिग्नलला थांबलेल्यांशी सुसंवाद साधला.ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यांना हेल्मेट घालण्याची, वाहने नियंत्रित वेगाने चालवावी, याबाबत प्रबोधन केले. कवयित्री मधूश्री ओव्हाळ यांनी वाहतूक सुरक्षेची शपथ सर्वाना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.