Pimple Gurav : वटपोर्णिमेला विधवा महिलांच्या हस्ते रविवारी वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – सावित्रीच्या लेकींचा मंचच्या वतीने वटपोर्णिमेच्या दिवशी विधवा महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांचे वृक्षारोपण कऱण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव मीरा कंक यांनी दिली.

पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ रविवारी (दि. 16 जून) हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे.

  • यावेळी अध्यक्ष रवीना आंगोळकर, उपाध्यक्ष मधुश्री ओव्हाळ, स्टेला गायकवाड, राजश्री कदम, माधुरी कांबळे, ज्योत्स्ना लोखंडे, वीना मट, स्नेहल आंगोळकर, शोभा जोशी, उज्वला केळकर, माधुरी ओक, फुलवती जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like