Student Felicitation: रयत विद्यार्थी विचार मंचच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज: रयत विद्यार्थी विचार मंचच्यावतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.(Student Felicitation) हा कार्यक्रम रविवारी (दि.7) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,कामगार भवन शेजारी पिंपरी येथे पार पडला.

कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप तसेच पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त परिमंडळ मंचक इप्पर साहेब, महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच रयत विद्यार्थी विचार मंच संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. (Student Felicitation) या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी 60 पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

Pune Drawing Competition: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले की, रयत विद्यार्थी विचार मंच ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना मदत व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे . आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवणारा घटक आहे त्यांचा सन्मान करून त्यांना देशाच्या प्रगतीच्या प्रवाहात घेणे हाच उद्देश आहे.कार्यक्रमाचे प्रस्तावना महासचिव संतोष शिंदे ,सूत्रसंचालन प्राजक्ता गायकवाड ,आभार प्रगती कोपरे ,संस्थेची भूमिका अभिजित साळुंखे ,विक्रांत शेळके यांनी मांडली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.