Pune Drawing Competition: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज: भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी हवेली, तहसिलदार हवेली, गटविकास अधिकारी हवेली आणि गट शिक्षणाधिकारी, हवेली यांच्या वतीने (Pune Drawing Competition) शहरातील 4 केंद्रावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 320 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

‘भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि गौरवशाली भारत : 1947 ते 2021’ हा विषय स्पर्धेसाठी देण्यात आला होता. पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, भारतीय जैन संघटना कॅम्पस वाघोली, विस्डम इंग्लीश स्कूल हडपसर आणि भावे हायस्कूल सदाशिव पेठ, पुणे या केंद्रावर ही स्पर्धा घेण्यात आली.

Alandi News : चऱ्होली खुर्द हद्दीतील आळंदी चऱ्होली रस्त्याची पावसामुळे बिकट अवस्था

यातील प्रत्येक केंद्रात 3 अशा प्रकारच्या 12 चित्रांचे प्रदर्शन 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.(Pune Drawing Competition) यशस्वी स्पर्धकांना 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे.

 

उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसिलदार तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के आणि गटशिक्षणाधिकारी हवेली राजेसाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. (Pune Drawing Competition) स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी प्रमोद भांड, हिंदुराव चौक, अशोक शिंदे, लोकश चिरमुल्ला, केंद्र प्रमुख सुधीर भारती,अंकुश बडे, रोहिणी दोडमिसे, किशोर भोसले, गोपाळ शिवशरण यांनी केंद्र समन्वयक म्हणून कामकाज पाहिले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.