Pimpri : शहरात 148 नाले! नालेसफाईला 31 मे ची ‘डेडलाईन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना (Pimpri) पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य  विभागाने नालेसाफसफाईचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात 148  नाले आहेत. नालेसफाईचे काम सुरु असून काम पूर्ण करण्यासाठी 31 मे ची ‘डेडलाईन’ असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून 148  नाले आहेत. त्यामध्ये ‘अ’ प्रभागात 25, ‘ब’ 15, ‘क’ 29, ‘ड’ 12, ‘ई’ 16, ‘फ’ 19, ‘ग’ 12 आणि ‘ह’ प्रभागात 20 नाले आहेत. महापालिकेच्या वतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते. उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसाफई केली जाते. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. नाल्यांची साफसाफई मोहिम एप्रिलपासूनच सुरु केली आहे. आत्तापर्यंत 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Talegaon : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या ‘तू म्हणशील तसं!’ नाटकाला कलापिनी तळेगावकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद

महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, नालेसफाईसाठी बीआरटी, स्थापत्य विभागाने आरोग्य विभागाला आवश्यक ती मशनरी जेसीबी, पोकलेन, खेकडा (जिथे जेसीबी जात नाही) मशीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.  त्यानुसार मशिनरी उपलब्ध झाली असून नाले साफसफाईचे काम सुरु आहे. आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत काम चालू आहे. नाले, स्ट्रॉम वॉटर पुलाखालचे बंद पाईप (सीडी वर्क) या ठिकाणची साफसफाई केली जात आहे. 1 लाख 1 हजार 920 मीटर नाल्यांची लांबी आहे. तर, रुंदी 739 मीटर आहे. 15 एप्रिल पासून नालेसफाईचे कामकाज (Pimpri) हाती घेतले. 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. 31 मे पर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.