Pimpri : परदेशवारी केलेले 1922 जण ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज – परदेशवारी करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्यांची संख्या मोठी आहे. मागील दीड महिन्याच्या काळात परदेशातून तब्बल 1922 जण शहरात आले आहे. या सर्वांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तर, आज (शुक्रवारी) शहरातील आणखी दोघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चौदावर गेली आहे. आजपर्यंत 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यापैकी बारा जण बरे होऊन घरी गेले आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 701 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज अखेर 626 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज (शुक्रवारी) 74 संशयितांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 74

#पॉझिटीव्ह रुग्ण – 2

#निगेटीव्ह रुग्ण – 31

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 52

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 66

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 58

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 12

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 26

# दैनंदिन भेट दिलेल्या घरे – 11356

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 31986

#होम क्वारंटाईन नागरिकांची संख्या – 1922

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.