Pimpri: तब्बल 2370 पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर यशस्वी मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.63 टक्के

2370 Pimpri-Chinchwadkars successfully defeated Corona; The patient recovery rate is 59.63 percent : तब्बल 2370 पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर यशस्वी मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.63 टक्के

ॲक्टीव्ह रुग्णांचे प्रमाण 38.87, तर मृत्यूचे 1.48 टक्के

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजपर्यंत 2370 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.63 टक्के आहे. तर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाढीचे प्रमाण 38.87 टक्क्यांवर गेले आहे. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1545 झाली आहे. आजपर्यंत शहरातील 59 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.48 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वाढत आहे.

मागील चार दिवसात नवीन एक हजार रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

10 मार्चपासून आजपर्यंत शहरातील 2370 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.63 टक्के आहे. तर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णवाढीचे प्रमाण 38.87 टक्क्यांवर गेले आहे. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1545 झाली आहे.

आजपर्यंत शहरातील 59 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.48 टक्के आहे.

दरम्यान, सक्रिय रुग्णांपैकी तब्बल 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्रमाण जवळपास दोन टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.