Pimpri: मावळसाठी 32 उमेदवारांचे अर्ज दाखल; ‘यांनी’ भरले उमेदवारी अर्ज

अर्जांची छाननी उद्या; शुक्रवारी माघारीची अंतिम मुदत

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 32 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज (मंगळवारी) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्राप्त अर्जांची छाननी उद्या (बुधवारी) होणार आहे. तर, शुक्रवारी (दि.12) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. 29 एप्रिलला या दोन मतदारसंघासाठी प्रत्यक्षात मतदान पार पडणार आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 2 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. 6 एप्रिलपर्यंत केवळ 7 उमेदवाराचे अर्ज आले होते. एकाच दिवसात 8 उमेदवारांनी तर, आज शेवटच्या दिवशी 17 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकूण 32 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

…..’यांनी’ भरले उमेदवारी अर्ज!
शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी चार तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वचिंत बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील, त्यासोबतच बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे आप्पा उर्फ जगदीश शामराव सोनवणे, अपक्ष म्हणून अमृता अभिजीत आपटे, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, अपक्ष म्हणून बाबाराजे गणपतराव देशमुख, धर्मराज यशवंतराव तंतरपाळे, प्रकाश गणपत देशमुख, राकेश प्रभाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी अपक्ष दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हिन्दुस्तान जनता पार्टीचे भीमराव आण्णा कडाळे, बळीराजा पार्टीचे गुणाट संभाजी नामदेव, अजय हनुमंत लोंढे यांनी अपक्ष, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील यांनी दोन आणि रिपल्बिकन सोशालिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड, अपक्ष विजय हनुंमत रौंधळ, बहुजन रिपब्लिकन पार्टीचे सुनील बबन गायकवाड, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदिश श्यामराव सोनवणे, अपक्ष प्रकाश लखवाणी, बाळकृष्ण धनाजी घरत, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ, जाफर चौधरी, राजेंद्र मारुती काटे, सुभाष गोपाळ बोधे, जया संजय पाटील, नुरजुना शेख, घोडके श्याम आणि शिवाजी तानाजी धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.