Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात 325 अनधिकृत होर्डिंग; 22 जणांवर फौजदारी कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 1850 अधिकृत होर्डिंग्ज आहेत. तर, 325 अनधिकृत होर्डिग्ज असून आकाशचिन्ह व परवाना विभागाने या होर्डिग्ज धारकांना नोटीस बजाविल्या आहेत. तर, आतापर्यंत 22 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात होर्डिंग काढताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने होर्डिंग्जचा सांगाडा कोसळल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील प्रत्येक चौकात फ्लेक्‍स व होर्डिंग्ज उभारले आहेत. यामध्ये काही अनधिकृत होर्डींग्जचा देखील समावेश आहे. जून महिन्यात पावसामुळे होर्डींग्ज पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जच्या संख्येला आळा घालण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाने धोरण ठरविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली जात आहे. पुण्यातील घटनेनंतर महापौर राहुल जाधव यांनी शहरातील सर्व होर्डिंग्जचे धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.