Pimpri : पिंपरीत भरदिवसा 65 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 65 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता योगी को ऑपरेटिव्ह सोसायटी, पिंपरी येथे घडली.

सतीश तेजभान ईसरानी (वय 45, रा. योगी को ऑपरेटिव्ह सोसायटी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 10) फिर्यादी इसरानी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दुपारी एक वाजता अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.