Pimpri Crime : पुण्या पाठोपाठ पिंपरीतही आयपीएलवर बेटींग करणाऱ्य़ा दोघांना अटक

एमपीसी न्यूज पुण्यात शनिवारी कोंढवा येथून पोलिसांनी आयपीएल मॅचवर बेटींग लावणाऱ्या नऊ जणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पिंपरी परिसरातही छापा टाकून (Pimpri Crime)) आयपीएल मॅचवर बेटींग करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हि कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी (दि.8) केली.

नरेश जगन्नाथ अग्रवाल (वय 40 रा. पिंपरी) व विशाल राजू अग्रवाल (वय 24 रा.पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Wakad : गुगल लोकेशन रिव्ह्यूव देण्याच्या बहाण्याने सुमारे पावणे तेरा लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पिंपरीतील रिव्हर रोड येथील जय हिंद हॅन्ड्यूलूम दुकानाच्या मागे विनापरवाना मुंबई ईंडियन्स विरुद्ध चेन्न्ई सुपर किंग्ज या टि 20 सामन्यावर बेटींग करत होते. (Pimpri Crime) पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली असून घटना स्थळावरून 52 हजार 155 रुपयांचे 5 मोबाईल, वही डायरी व पेन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.