Pune : तब्बल दीड वर्षांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत निधी मंजूर

एमपीसी न्यूज :  जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान (Pune) झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला नुकताच 1.95 कोटी रुपयांचा निधी दीड वर्षांनंतर प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते आणि दुरुस्ती न झालेल्या पाणीपुरवठा योजनांवर हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

जुलै 2021 मध्ये झालेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील 381 गावांतील 23,000 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सात तालुक्यांमध्ये शेती व फळपिकांचे नुकसान झाले. त्यात मावळ आणि मुळशी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Pimpri Crime : पुण्या पाठोपाठ पिंपरीतही आयपीएलवर बेटींग करणाऱ्य़ा दोघांना अटक

शेती, फळपिकांची घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजनांचेही नुकसान झाले. 3,43,60,758 रुपयांच्या मदत निधीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला अहवाल सादर केला होता.

तसेच विभागीय आयुक्तालयाने अतिवृष्टीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचा केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार तब्बल दोन (Pune) वर्षांनंतर नुकताच पुणे जिल्ह्यासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.