Pimpri : एक भारतीय प्रथमच जातोय उत्तर ध्रुवावर

एका भारतीयाला पुढे जाण्यासाठी द्या ऑनलाईन मत; आनंद बनसोडेचे सर्वांना आवाहन

एमपीसी न्यूज – रक्त गोठवणारी थंडी, पाण्यावरील हजारो किलोमीटर विस्तीर्ण बर्फ, बर्फाचं गोठणं आणि वितळणे सारखं सुरु असणा-या आर्टिक महासागरावर प्रथमच एक भारतीय एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे जात आहे. उत्तर ध्रुव पृथ्वीचे सर्वात वरचे टोक असून आनंदला तिथे म्हणजेच आर्टिक महासागरावर जाण्यासाठी भारतीयांच्या ऑनलाईन मतांची आवश्यकता आहे.

‘पोलर (उत्तर ध्रुव) एक्सपीडीशन’मध्ये आनंदला नामांकन मिळाले आहे. जागतिक ऑनलाइन वोटिंगमध्ये सध्या तो पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान, मंगोलिया, ग्रीस येथील युवक आनंदच्या पुढे आहेत. त्यामुळे आनंदाला पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मतांची गरज आहे. आनंदचा विजय हा भारताचा विजय असल्याने त्याला ऑनलाईन मताचे पाठबळ देण्यासाठी 14 डिसेंबरपूर्वी खालील प्रक्रिया करून मत नोंदविण्याचे आवाहन आनंद बनसोडेने केले आहे.

# या लिंकवर क्लिक करा – https://goo.gl/oPJb7u
# फेसबुक अकाउंटवरून लॉगइन करा
# Continue करा
# ‘I’m not Robot’ समोरील चौकोनाला क्लिक करा
# यानंतर आपले मत ग्राह्य धरले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.