BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महिलांना जीवे मारण्याची धमकी देत दहशत पसरविणा-या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन महिला मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना दोन आरोपींनी त्यांना रस्त्यात शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्की महेश राठी (वय 25), सविता विक्की राठी (वय 22) आणि अंगद कांबळे (वय 26, सर्व रा. नेहरूनगर पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी महिला आणि त्यांच्या भावाची बायको असे दोघीजणी मिळून मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात होत्या. त्या विठ्ठलनगर येथील दोस्ती बेकरीसमोर आल्या आसता विक्की आणि अंगद यांनी त्यांना पाहून शिवीगाळ केली. याचा जाब विचरण्यासाठी महिला आरोपींकडे गेल्या असता ‘तुम्हाला कापूनच टाकतो’ अशी धमकी दिली.

तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून ‘जर कोणी मधे आले तर त्याला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून परिसरात दहशत पसरवली. काही वेळेत त्या ठिकाणी पोलीस आले. पोलीस आल्यानंतर विक्कीची पत्नी सविता हिने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3