Chakan : भोसे येथे जीप-कंटेनरची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात पुढील वाहन ओव्हरटेक करून ओलांडण्याच्या प्रत्यात्नात असलेल्या जीप मोटारीची आणि समोरून वेगात आलेल्या अवजड कंटेनरची समोरासमोर धडक जोरदार होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एका बड्या कंपनीचे दोन अधिकारी यांचा जागीच मृत्यू झाला तर, याच जीपचा चालक गंभीर जखमी झाला. या भीषण अपघात चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भोसे (ता.खेड) गावच्या हद्दीत इंडियन ऑइल प्रकल्प लगत मंगळवारी (दि.२५) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास झाला.

वल्लभ अर्जुन रावता (वय ४५ रा.कल्याण,मुंबई) आणि संजय गीताराम वाल्मीक (वय ४५ , रा. पनवेल, जि.रायगड ) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून याच बोलेरो जीपचा चालक दीपक गणपत गोसावी (वय ३७ रा. पनवेल, जि. रायगड) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like