Pimpri: ‘कोरोनाबाधित रुग्णांच्या जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी’

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व महापालिकांना सूचना

एमपीसी न्यूज –  कोरोना संशयित रुग्ण तसेच बाधितांवर होत असलेल्या उपचारादरम्यान तयार झालेल्या जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय आणि आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना पा’वल्या आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी यासंदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय आणि आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. क्वारंटाइन व आयसोलेशन कक्ष, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कच-याचे संकलन, वाहतुक व विल्हेवाट लावताना खबरदारी घेण्याची सूचना मंडळाने केली आहे.

सध्या डॉक्टर, नर्स व अन्य रुग्णालयीन कर्मचारी यांनाही संसर्ग होण्याचे धोके वाढले आहेत. त्यासाठी सीबीडब्ल्युटीएफने (कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी) जैव वैद्यकीय कचरा 48 तासांच्या आत उचलून त्याची विल्हेवाट करणे बंधनकारक राहील, असे केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळांनी सूचित केले आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

#आरोग्य कर्मचारी, नागरिक, प्रयोगशाळा कर्मचारी, क्वारंटाइन, आयसोलेशन कक्षात वापरलेले फेसमास्क, हातमोजे आणि इतर संरक्षक उपकरणे स्वतंत्रपणे पिवळ्या प्लास्टिक बॅगमध्ये संकलित केली जातील.

# बायोहजार्ड चिन्हासह त्यावर ‘कोविड 19कचरा’ असे चिन्हांकन केले जाईल.

#उपचारादरम्यान निर्माण झालेला व पिवळ्या बॅगमध्ये संकलन केलेल्या कच-यावर जंतुनाशक फवारणी करावी.

#तो पिवळ्या पिशव्यांमधून कचरा सामान्य प्रक्रिया सुविधा ऑपरेटरच्या ताब्यात जाईल.

#तो सामान्य जैव वैद्यकीय प्रक्रिया सुविधा येथे नेला जाईल. त्याचे रेकॉर्ड  ठेवून दैनंदिन अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविला जाईल.

# क्वारंटाइन व्यक्ती, आयसोलेशन वॉर्डमधील कचरा काळ्या पिशव्यांमधून जमा करून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

# घनकचरा बंद गाड्यांमधून लँडफील साइटवर पोहोचविला जाईल व प्रत्येक खेपेनंतर गाडीचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

#लँडफील साइटवर दोन मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचा खड्डा खोदून त्याचा पृष्ठभाग सोडिअम हायपोक्लोराइटने फवारणी करावा.

# त्यात कचरा पसरविल्यानंतर त्यावर माती पसरावी.

# पिवळ्या व काळ्या पिशव्यांमधील कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट लावणा-या कर्मचा-यांना पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट, संरक्षणात्मक साधने, जंतुनाशक फवारणीसाठी लागणारी साधने पुरविणे बंधनकारक राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.