Chinchwad : रविवारी 325 जणांवर कारवाई; पिंपरी-चिंचवड शहर कोरोना संक्रमणशील क्षेत्र म्हणून जाहीर

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 325 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 19) कारवाई केली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला रविवारी कोरोना संक्रमणशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई केली जात आहे.

तसेच विनाकारण घराबाहेर फिरणे, एका ठिकाणी गर्दी करणे अशा कृत्यांवर देखील पोलीस बारीक लक्ष ठेऊन आहेत. असे प्रकार निदर्शनास येताच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे चिंचवड (47), भोसरी (2), एमआयडीसी भोसरी (5), दिघी (12), आळंदी (3), चाकण (2), वाकड (23), तळेगाव दाभाडे (11) एकूण 105 जणांवर कारवाई करण्यात आली.

तर सीआरपीसी 149 प्रमाणे : चिंचवड (7), एमआयडीसी भोसरी (14), दिघी (10), चाकण (62), हिंजवडी (84), सांगवी (15), चिखली (10), देहूरोड (7), शिरगाव चौकी (6) अशी एकूण 215 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त वाकड, चिखली, देहूरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक आणि आळंदी पोलीस ठाण्यात दोन मुंबई पोलीस कायदा कलम 65 ख, ड, ई, फ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.