Pimpri : महात्मा फुले डॉ. आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त गुरुवारी दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त उद्या, गुरुवारी (दि. 11) सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पिपरी-चिंचवड शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे.

सकाळी नऊ वाजता भक्ती शक्ती शिल्प-निगडी येथुन दुचाकी रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली भेळचौक, संभाजी चौक, निगडी प्राधिकरण म्हाळसाकांत हायस्कुल चौक, आकुर्डी गावठाण, खंडोबामाळ चौक, आकुर्डी दळवीनगर चिंचवड चापेकर चौक गांधी पेठ चिंचवड गांव, भीमनगर चौक, लिंक रोड अहिल्यादेवी पुतळाचौक, मोरवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे निघून पिंपरीतील महात्मा फुले पुतळा येथे या दुचाकी रॅलीचा समारोप होईल.

या दुचाकी रॅलीचे आयोजन विविध समविचारी संघटना, मंडळ यांचे सहकार्याने संयुक्तरित्या केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.