AAP :  ‘मोदी हटाव, देश बचाव’; आपची शहरात फलकबाजी

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीने (AAP) ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात फलकबाजी केली आहे.

मोदी सरकार दडपशाही करत आहे. हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एल आय सी, एस बी आय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली.(AAP) परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केल्याचा आरोप आपचा आहे.

Corona : कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे घाबरु, पॅनिक होऊ नका, यंत्रणा सज्ज –  आयुक्त सिंह

ईडी-सीबीआय या केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.(AAP) या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने देशभरात ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम देशभर सुरू केल्याचे आपकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.