Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 1 हजार 180 रुग्णांची नोंद; 2 हजार 256 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1 हजार 180 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 580 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 53 हजार 2 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 10 हजार 830 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 10 हजार 558 रुग्ण गृहविलगीकरणात असून 272 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 80 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 944 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 685 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 32 लाख 99 हजार 158 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.