Sangavi News : 70 वर्षीय वृद्धाला काढले घराबाहेर ; जलसंपदा, बांधकाम विभाग अभियंता विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – कोणतीही पूर्व नोटीस न देता बेकायदेशीरपणे PWD च्या रुममध्ये घुसून 70 वर्षीय इसमाला घराबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग आणि कुकडी सिंचन मंडळ कार्यालय लिपिक टंकलेखक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत जुनी सांगवी येथे हा प्रकार घडला.

चंद्रकांत तुकाराम कांबळे (वय 69, रा. चंद्रमणी नगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत गुरुवारी (दि.03) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता डि. आर. मोरे, मुलकी बांधकाम व दुरुस्ती विभागाचे उपविभागीय अभियंता यु. एस हावरे, कुकडी सिंचन मंडळाचे लिपिक टंकलेखक पुनम अमित वाबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत कांबळे यांना कोणतीही पूर्व नोटीस न देता बेकायदेशीरपणे PWD च्या रुममध्ये घुसून घराच्या बाहेर काढण्यात आले. घराबाहेर काढताना कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा व मुंबई सरकारी जागा अधिनियम – 1955 (सुधारणा) अधिनियम 2007 अंतर्गत कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.