Pune News : ‘उमेद’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धा उत्साहात, कवी विकास गजापुरे प्रथम

एमपीसी न्यूज – ‘कविता : तुझी आणि माझी’ काव्य समूहाच्या वतीने ‘उमेद’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. 5 ते 20 जानेवारी दरम्यान फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली. मराठी आणि हिंदीतील नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत, कवी विकास गजापुरे यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

या काव्य स्पर्धेत महाराष्ट्रासह जगभरातील आबुधाबी, सिंगापूर आणि न्यूयॉर्क येथील कवी आणि कवयित्री यांनी सहभाग नोंदविला.’शब्द आशयाचे घन’ या काव्य संग्रहाचे कवी संपत माणिकराव गर्जे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

‘कोणत्याही स्पर्धेतील यशापयश खिलाडू वृत्तीने स्वीकारता आले पाहिजे, तरच आयुष्याच्या रणांगणातील अनेक स्पर्धा आपण लीलया जिंकू शकतो.’ असे समूह संचालक कवी ज्ञानेश सूर्यवंशी म्हणाले.

‘उमेद’ काव्य स्पर्धेतील विजेते

  • प्रथम क्रमांक – विकास गजापुरे, नागपूर
  • द्वितीय क्रमांक – स्मिता धर्माधिकारी, पुणे
  • तृतीय क्रमांक – गौतम वेंगुर्लेकर, सावंतवाडी

उत्तेजनार्थ

मनीषा कुलकर्णी आष्टीकर (परभणी), मुक्ता कुलकर्णी (जयसिंगपूर), भानुदास धोत्रे (परभणी), दीपक अमोलीक (पुणे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.