Wakad News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बाबर कुटुंबीयांचे सांत्वन

एमपीसी न्यूज – बाबर कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) भेट घेऊन सांत्वन केले. माजी खासदार, माजी आमदार गजानन बाबर यांचे (बुधवारी) अल्पशा आजाराने निधन झाले.

माजी खासदार गजानन बाबर यांच्या निधनाने जनसेवेला वाहून घेतलेलं, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारं नेतृत्व हरपलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पिंपरी-चिंचवडमध्ये रुजवणारा पहिल्या पिढीतील ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीतील, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्याचं योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर पवार यांनी आज वाकड येथील बाबर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आज पुण्यातील वाकड येथे माजी खासदार स्व. गजानन बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली; त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व सहसंवेदना व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.