Pimpri Chinchwad : खोटे स्क्रीनशॉर्ट दाखवून पती-पत्नीने केली तब्बल 300 दुकानदारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad ) दुकानदारांना ऑनलाइन पैसे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ओहेगाव येथून एका व्यक्तीला अटक केली. एका दुकानदाराने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. 

या प्रकरणी पोलिसांनी गणेश शंकर बोरसे (वय 34) या आरोपीला अटक केली असून या गुन्ह्यात त्याची पत्नी देखील सामील असल्याचे समोर आले आहे. परंतु, अद्याप तिला अटक केलेली नाही.

सविस्तर माहिती अशी, की आरोपी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड (NEFT) ट्रान्सफरसाठी बनावट अॅप्लिकेशन वापरत होते. दुकानात खरेदी केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याचा दावा करून स्क्रीनशॉट दाखवत असत.

दुकानदारांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यास आरोपी त्यांचा मोबाईल नंबर दुकानदाराला देत आणि निघून जात. काही वेळाने या नंबरवर कॉल केला असता हा नंबर स्विच ऑफ दाखवत.

Pune : अजित पवारांच्या शक्तिप्रदर्शनाला पुण्यातून प्रारंभ; भव्य रॅलीतून अजितदादा कोल्हापूरकडे रवाना

अशा प्रकारे आरोपी आणि त्याच्या पत्नीने गेल्या काही महिन्यांत (Pimpri Chinchwad)  पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 300 हून अधिक दुकानदारांची फसवणूक केली होती. या दरम्यान एका व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे वायफाय कनेक्शन शोधून काढले.  ज्याचा वापर पीडितांना फसवण्यासाठी मोबाईल क्रमांकासह केला गेला होता. आणि अखेर आरोपीला अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.