Pune : अजित पवारांच्या शक्तिप्रदर्शनाला पुण्यातून प्रारंभ; भव्य रॅलीतून अजितदादा कोल्हापूरकडे रवाना

एमपीसी न्यूज : कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (Pune ) सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली ताकद दाखवल्या नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आपले शक्तिप्रदर्शन करण्यास तयार झाले आहेत. यासाठी आता पुण्याहून त्यांच्या रॅलीला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला आहे. अजित पवार यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक आणि आरतीही करण्यात आली. 

पुणे ते कोल्हापूर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रॅलीच आयोजन करण्यात आले आहे.  शिवाजीनगर येथील जिजाऊ निवासस्थान येथून रॅलीला सुरुवात झाली असून मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर हे उपस्थित आहेत. तर कार्यकर्ते मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.

Lonavala : पर्यटकांना लुटणारी टोळी अखेर जेरबंद; पोलिसांनी राबवली विशेष मोहीम

अजित पवार कोल्हापुरात आपली ताकद दाखवण्यासाठी (Pune ) मोठे शक्तिप्रदर्शन करणार असून कोल्हापुरात देखील याची जय्यत तयारी झाली आहे. शरद पवार यांच्या सभेला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, आता हीच साथ कोल्हापूरकर अजित दादांना देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.