Pimpri Chinchwad : वाकड, पिंपळे निलख, थेरगावमध्ये नागरिक कचरा व राडारोड्याने त्रस्त

एमपीसी न्यूज : वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, थेरगावमध्ये कचरा व राडारोड्याने नागरिक त्रस्त आहेत. वाकडमधील रहिवासी (Pimpri Chinchwad) अरुण देशमुख म्हणाले, की थेरगावमधील औंध – किवळे बीआरटी रोडवरील 16 नंबर बसस्टॉप येथे कचऱ्याचा ढीग लागलेला असतो.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुमारे 1 महिन्यापूर्वी वाकड – नाशिक फाटा बीआरटी रोडवरील मानकर चौक ते कस्पटे चौक पर्यंत असलेले अनधिकृत फर्निचर शोरूम तोडले होते. मालकांनी शोरूममधील फर्निचर व साहित्य विकले; पण राडरोडा तसाच आहे. तसेच, मानकर चौकजवळ फूटपाथवर पेवर ब्लॉक्सचे ढीग आहेत. पिंपळे सौदागरमधील या रोडजवळील सावित्रीबाई फुले उद्यानाजवळ कचरा साठलेला असतो.

Shivajirao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धमकी देणाऱ्या 17 जणांवर गुन्हा दाखल

अमेय नेवरेकर म्हणाले, की इवाना कावेरीनगर पोलीस लाईनवरील इवाना बिल्डिंगपासून वाकड पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये कचरा साचलेला असतो. तसेच, वाकडमधील दत्त मंदिर रोडवरील कॅपिटोल सोसायटीच्या गेटजवळ कचऱ्याचा ढीग साचलेला असतो. त्याचा त्रास सोसायटीमधील रहिवाश्यांना होतो.

‘ड’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त व प्रभाग अधिकारी उमाकांत गायकवाड म्हणाले, की शोरूम मालकांनी त्यांचा शोरूमचा राडारोडा काढणे अपेक्षित आहे. त्यांनी पुढील काही दिवसात नाही काढला तर मनपा (Pimpri Chinchwad) त्यांना नोटीस देऊन काढायला सांगेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.