Shivajirao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धमकी देणाऱ्या 17 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Patil) यांना धमकी देणाऱ्या 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रणगट यांनी सांगितले, की आज खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांनी राजगुरूनगर बस स्टॅन्डजवळ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, त्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो जाळण्यात आला. तसेच, त्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली. त्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 143, 147, 149, 501, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले होते. तसेच, काही कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत त्यांचे हात पाय तोडण्याची धमकी दिली.

Chandrakant Patil : महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये

गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे, गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण, शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Shivajirao Patil) करण्यात आला आहे.

याप्रकरणी आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमुख अंकुश शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे. खेड येथे पुणे-नाशिक महामार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारले होते. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून लोकांना अडवून ठेवले. त्यानंतर निषेध व्यक्त करत कार्यकर्ते हे आढळराव पाटील यांच्या घरी गेले. त्यांना हातपाय तोडू अशी धमकी दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.