Pune University Entrance Exam: आजपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा

प्रवेशासाठी 21 हजार सहाशे अर्ज: 21 ते 24 जुलै दरम्यान होणार परीक्षा

एमपीसी न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून त्याची प्रवेश परीक्षा आजपासून (दि.21)  सुरू होत आहे. (Pune University Entrance Exam) या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 21 हजार 670 अर्ज आले आहेत. महाराष्ट्रासह भारतभरातील 22 केंद्रांवर ही पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठीची ऑनलाईन परीक्षा 21 ते 24 जुलै दरम्यान होणार आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची ही प्रवेश प्रक्रिया होत असून याअंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा एकूण 174 अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. (Pune University Entrance Exam) त्यामधील 93 अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा 26 ते 24जुलै दरम्यान होणार आहे. या 174 अभ्यासक्रमाच्या एकूण 7 हजार 850 जागा उपलब्ध आहेत. ही परीक्षा शंभर गुणांची असून यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत त्या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना मेलच्या माध्यमातून कळवले आहे.

 

 

विद्यार्थ्यांनी केंद्रांवर जात ही परीक्षा द्यायची असून यासंबंधी सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रवेश विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवेश परीक्षेसाठी आलेले अर्ज
पदवी 748
पदव्युत्तर पदवी. 18270
पदविका. 725
पदव्युत्तर पदविका. 909
प्रमाणपत्र अभ्यासक्रम. 1018

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.