Pimpri Chinchwad Road : स्मार्ट सिटी की खड्ड्यांची सिटी?

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीकडे (Pimpri Chinchwad Road) वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. पहिल्याच पावसात महापालिकेचा कारभार उघड झाल्याने शहराचा काही ठराविक भाग वगळता बहुतांश रस्त्यांवरील खड्यांमुळे स्मार्ट सिटी की खड्ड्यांचे शहर म्हणण्याची वेळ पिंपरी-चिंचवडकरांवर आली आहे.

महापालिकेचे सुमारे सहा हजार कोटींचे बजेट आहे. त्यापैकी सुमारे 1200 ते 1500 कोटी रूपये फक्त रस्त्यांच्या (स्थापत्य) कामासाठी खर्च केले जातात. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत अशी साधी अपेक्षा करदात्या नागरिकांची आहे. पिंपरी-चिंचवड शहर म्हटले, की अनेकांना प्रशस्त रस्त्यांचे चित्र दिसते; मात्र हे चित्र किती पोकळ आहे. ते पहिल्याच झालेल्या जोराच्या  पावसामुळे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व भागातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

Pune Crime Branch: व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी निवडला चोरीचा मार्ग

कासारवाडी, वल्लभनगर येथील एसटी स्टॅन्ड, निगडी भक्ती-शक्ती चौक, चिंचवडमधील बिर्ला हॉस्पिटल, दापोडी, पिंपळेगुरव आणि मोशीसह शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरूनही पडत आहेत. दरम्यान, शहरात किती खड्डे आहेत. याची नेमकी आकडेवारी नाही. खड्डे टप्प्या-टप्प्याने बुजविण्यात येत असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले.

अनेक ठिकाणी अर्धवट बुजवलेत खड्डे!

पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad Road) सगळीकडे रस्त्यांची खोदाई केली जात आहे. अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भुमिगत गटारे, स्मार्ट सिटीची कामे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सातत्याने खोदाई सुरु असते. खोदाई केल्यानंतर खड्डे व्यवस्थितरित्या बुजविले जात नाहीत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.