Pimpri Chinchwad RTO : सावधान! विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर आरटीओ कडून कठोर कारवाई

एमपीसी न्यूज – विना हेल्मेट वाहन चालवणे अलीकडच्या (Pimpri Chinchwad RTO) काळात अनेकांना भूषणावह वाटते. आपल्याला कोण काय करतंय, अशा अविर्भावात वाहने चालविणारे वाहन चालक अपघात झाल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जातात. त्यामुळे नियम पाळून वाहने चालविल्यास नागरिकांना अशा परिणामांना सामोरे जावे लागणार नाही. यासाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विना हेल्मेट वाहन चालवणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

महाराष्ट्र राज्यात सन 2022 व 2023 मध्ये घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, एकूण रस्ते अपघातामध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अपघातांमध्ये 70 ते 80 टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे.

वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरण्या संबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम पिंपरी चिंचवड आरटीओ कडून राबविण्यात येत आहे.

मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. सर्वप्रथम पिंपरी चिंचवड आरटीओकडून विविध खाजगी कार्यालये, शाळा, कॉलेज तसेच विविध शासकीय आस्थापनांमध्ये हेल्मेट वापराविषयी प्रबोधनात्मक नोटीस देण्यात आल्या. तसेच विविध ठिकाणी याविषयी प्रबोधनात्मक सत्र घेण्यात आली.

Maharashtra : 45 वर्ष होऊनही अंमलात न आल्याने महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द

या माध्यमातून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे का गरजेचे आहे हे विविध (Pimpri Chinchwad RTO) उदाहरणे तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून देण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करताना जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे चार हजार पेक्षा अधिक विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. केवळ जुलै महिन्यात एक हजार 486 जणांवर विना हेल्मेट प्रवास केल्या प्रकरणी कारवाई केली आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “पुणे जिल्ह्यात प्राणांतिक अपघातामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली आहे. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.