Eco-friendly Ganeshotsav : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी घेणार शहरात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2022’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या वतीने नागरिकांसाठी पर्यावरणपूरक (Eco-friendly Ganeshotsav) गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घरगुती व सार्वजनीक गणपती असा सर्वांना भाग घेता येणार आहे.

गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालीलपैकी एक थीम निवडणे आवश्यक आहे. यामध्ये पर्यावरणपूरक सजावट, गणेशमूर्तीची सर्वोत्कृष्ट सजावट, सर्वोत्कृष्ट समाजप्रबोधनपर सजावट/कार्यक्रम या निकषावर स्पर्धेचा निकाल दिला जाणार असून घरगुती व सार्वजनिक गणपतीसाठी निकष सारखे असणार आहेत.

स्पर्धेचा तपशील आणि नियम – Eco-friendly Ganeshotsav

पहिली फेरी: इच्छुक स्पर्धकांनी गणेशोत्सवाचे फोटो आणि त्याची थोडक्यात माहिती सोबत दिलेल्या लिंकवर अपलोड करावी. फोटो आणि माहिती अपलोड करण्यासाठी सर्वांत आधी पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर https://bit.ly/EcoFriendlyGaneshFestivalPCMC या लिंकवर क्लिक करून माहिती भरावी.

· स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा अंतिम रविवार, दि. 4 सप्टेंबर 2022.

· परीक्षकांकडून 10 स्पर्धकांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात येईल.

Talegaon-Dabhade: पं. परळीकर आणि पं. आल्पे यांच्या गायनाने तळेगावकर सुखावले

दुसरी फेरी:

· पहिल्या फेरीत निवड झालेल्या 10 स्पर्धकांच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर प्रसिद्ध करण्यात येतील.

· सदर छायाचित्रे प्रसिद्ध करण्यापूर्वी दोन दिवस आधी संबंधित स्पर्धकाला सूचित करण्यात येईल.

· प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या छायाचित्राला जास्तीत जास्त लाईक मिळवण्यासाठी तीन दिवस मिळतील. स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी स्पर्धकांनी पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या फेसबुक पेजला फॉलो करून जास्तीत जास्त लाईक मिळवणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिके देण्यात येतील. तसेच, सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. स्मार्ट सिटी प्रकल्प या विषयाशी संबंधित सर्वोत्कृष्ट देखाव्याला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

स्पर्धेच्या नियम व अटी: स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, स्पर्धेसाठीचे सर्व हक्क पीसीएमसी स्मार्ट सारथीकडे राखून ठेवण्यात आले आहेत, स्पर्धकांनी सादर केलेली छायाचित्रे, माहिती तथ्यांवर आधारित असणे अनिवार्य आहे. सादर केलेल्या माहितीच्या सत्यतेच्या संदर्भात स्पर्धक सर्वस्वी जबाबदार असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.