Pimpri News : पिंपरी चिंचवडकरांची राष्ट्रध्वज विक्री केंद्रांवर गर्दी 

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रध्वज विक्री केंद्रांवर शनिवारी गर्दी केली होती. भारताला स्वतंत्र होऊन 15 ऑगस्ट 2022 ला 75 वर्षे पुर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत हर घर तिरंगा अभियान  देशभर राबवण्यात येत आहे.

 

या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत महापालिका क्षेत्रामधील प्रत्येक घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, अशासकीय (खाजगी) आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यासाठी महापालिकेच्या अ,ब,क,ड,ई,फ,ग,ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये “राष्ट्र ध्वज विक्री केंद्र” उभारण्यात आले असून नागरिकांनी ध्वज खरेदीसाठी या केंद्रांवर गर्दी केली आहे.

 

 

महापालिकेने उपलब्ध करून दिलेला राष्ट्रध्वज हा सिल्क कापडापासून तयार करण्यात आला असून ध्वजाची किंमत नाममात्र आहे.तसेच २० जुलैनंतर ज्या मिळकतधारकांनी कर भरणा केला आहे त्यांना महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय ध्वज भेट देण्यात येत आहे.उद्या कार्यालयीन सुट्टी असल्याने व स्वातंत्रता दिवस परवा असल्याने नागरिकांनी शनिवारी राष्ट्रध्वज विक्री केंद्रांवर गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.