Pimpri : चहा ची टपरी फोडून सिगारेट व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – दोन चोरट्यांनी चहाच्या टपरीचा पत्रा उचकटून (Pimpri )आतील सिगारेट व गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना 27 व 28 डिसेंबर 2023 या कालावधीत पिंपरीतील संगवी कॉलेज समोर घडली.

या प्रकरणी गजानन बबन इंगळे (वय 39 रा चिखली) यांनी शुक्रवारी(Pimpri) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक! – ॲड. रामराजे भोसले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टेल्को रोडवर सांगवी कॉलेज समोर चहाची टपरी आहे. ती बंद असताना चोरांनी टपरीच्या वरील पत्रा उचकटून टपरीमध्ये प्रवेश केला.

तेथील सिगारेट तसेच गल्ल्या मध्ये असलेली रोख रक्कम असा 50 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून दिला आहे. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.