Pimpri : उन्हाळ्यात कैरीच्या पन्हयासाठी नागरिकांची पसंती

एमपीसी न्यूज : दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना (Pimpri) दिसत आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. हा वाढता उकाडा लक्षात घेता प्रत्येकजण उन्हाळ्यात थंड पेय पिण्यास प्रधान्य देतात. तसेच, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची सर्वाधिक गर्दी ही चविष्ट कैरीच्या पन्हयासाठी दिसून येत आहे.

उन्हाची चाहूल लागताच शहरात विविध भागात कैरीच्या पन्हाचे विक्रेते दिसून येतात. त्यामध्ये निगडी, आकुर्डी, चिंचवड या ठिकाणी कैरीच्या पन्ह मिळत असल्यामुळे या भागात कैरीची पन्हयाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे.

कारण कैरीचे पन्हे प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो, पचन क्रिया सुधारते, उन्हाळयात पचनासंबधीत अनेक त्रास होतात. त्यामुळे उन्हाळयात कैरीचे पन्ह गुणाकारी ठरु शकते. तसेच कैरीमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर इत्यादी घटक असतात. यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. त्यामुळे कैरीच्या पन्हाला मागणी वाढली आहे.

Tathawade : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक; साडेचार किलो गांजा जप्त

कैरीचे पन्हे तयार करण्यासाठी कैरी, साखर, इलायची, जीर्‍याची पूड, काळे मीठ, यांच्या मिश्रणातून तयार केले जाते. तसेच कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे (Pimpri) प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसात कैरीचे पन्हे शरीरासाठी योग्य आहेत.

तसेच, या पन्हाची किंमत केवळ 10 किंवा 20 रुपये असल्यामुळे ग्राहकांकडून पसंदी दिली जात आहे. तसेच, लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांकडून पन्हाचा स्वाद घेताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.