Pimpri : घरकुल येथे  विसर्जनाला तनपुरे फाउंडेशनच्या वतीने 6 हजार 985 मूर्तींचे संकलन  

एमपीसी न्यूज –  घरकुल येथे तनपुरे फाउंडेशनच्या वतीने व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) वतीने गणपती विसर्जना दिवशी एकूण 6 हजार 985 मुर्तींचे संकलन करण्यात आले. विसर्जन हौद व विसर्जन घाट प्रामुख्याने घरकुल, पिंपरी गाव घाट, चिंचवड गाव घाट, गणेश तलाव प्राधिकरण निगडी, चिखली घाट, मोशी इंद्रायणी घाट. येथे काल अनंत चतुर्दशी दिवशी जास्तीत जास्त सभासद व महिला भगिनी सहभागी झाले. या सेवा कार्यात संघटनेच्या सभासद यांनी वाहतूक नियोजन, निर्माल्य दान, मूर्ती दान संकलन करून दिवसभर सेवा कार्य केले.

घरकुल येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच भवरे . राजेश माने ,भाऊसाहेब वारे , काटे  यांनी विशेष लक्ष्य दिले. विशेष सहकार्य पोलीस प्रशासन चिखली पोलिस ठाणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर सर व एल आय बी चे दिनेश ढवळे  व  शिंदे साहेब यांचे (Pimpri) लाभले.

या सोहळ्यासाठी संघटनेच्या वतीने जे सभासद दिवस रात्र सेवा कार्य करत होते, शहरातील विविध ठिकाणी त्या सर्वांना नाष्टा व पाणी संघटनेचे उपाध्यक्ष  वासुदेव काळसेकर यांनी विविध घाटावर जावून वाटप केले.

Pune : अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस मित्र पर्यावरण मित्र विविध विभागाने एक आदर्श निर्माण केला. या सेवा कार्यात संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष विजयकुमार आब्बड, सचिव  लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष वासुदेव काळसेकर, कांतीलाल हरीणखेडे,  किसन शेवते , प्रताप सोनवणे, नितीन मोरे, धनंजय आव्हाड, संतोष शिंदे, कुणाल बडीगेर, चेतन चव्हाण, राजु माने, शैलेश रोकडे, मुकेश तोमर, शरद शिंदे, नयनभाई तन्ना, मयूर मडीवाल, हार्दिक जानी,  मुकेश चुडासमा, ज्ञानप्रकाश शर्मा. संजय कुमार ईशी. तुकाराम साठे. अरबाज शेख, दत्तात्रय देवकर, अभिषेक लमझाने. अमृता वैद्य, विद्या तांदळे, स्मिता सस्ते.नितीन सस्ते. सागर  सुपल सेवा कार्यात पदाधिकारी व सर्व सभासद व महिला भगिनी उपस्थित होते.

कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलिस मित्र, पर्यावरण मित्र संघटना व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात शहरातील विविध ठिकाणी गणपती बाप्पा (Pimpri) यांचे नदीत विसर्जन न करता पर्यावरण व नदी स्वच्छता अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने घरकुल येथे विसर्जन हौद या ही वर्षी करण्यात आला.

या सर्व सेवा कार्यात कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन चे 70 ते 75 सभासद निर्माल्य दान. मूर्ती दान या साठी गेले अनेक वर्ष या कार्यात सहभागी होत असतात. या ही वर्षी विविध विसर्जन घाट, विसर्जन हौद या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सेवा कार्य केले. काल गणेशोत्सव अनंत चतुर्दशी 10 वा दिवस या दिवशी शहरातील मोठ्या प्रमाणात मंडळ व घरगुती गणपती या दिवशी विसर्जित केले जातात.

सकाळी 9 ते रात्री 2 पर्यंत विविध मंडळ घरगुती गणपती यांचे मूर्ती संकलन करण्यात आले.त्याचबरोबर 5 गाड्या निर्माल्य जमा करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले. तसेच स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात (Pimpri) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.