Pimpri: निगडी-दापोडी बीआरटी मार्गाची आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गाची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शनिवारी) पाहणी केली. बीआरटी बसवरील चालक बीआरटीच्या सिग्नलचे पालन करत नाहीत. पीएमपीएलचे वॉर्डन देखील त्याकडे लक्ष देत नसल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आले. आयुक्त हर्डीकर यांनी पीएमपीएलच्या अधिका-यांना दूरध्वनी करुन याची तक्रार केली. तसेच यापुढे दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

काळभोरनगर येथील भुयारी मार्गजवळ दापोडी ते निगडी बीआरटीचे बस स्थानक आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी आयुक्तांनी पाहणी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज काळभोरनगर परिसराची पाहणी केली. यावेळी नगरसेविका काळभोर, नगररचना व विकास विभाग विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, ‘अ’ प्रभागाचे कार्यकारी अभियंता सुपेकर, बीआरटीचे प्रवक्ते तथा उपअभियंता विजय भोजने, उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, दीपक पाटील, विनायक माने उपस्थित होते.

काळभोरनगर परिसरात शैक्षणिक संस्था, शाळांची संख्या अधिक आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. बीआरटी मार्गावरील पीएमपीएलचे बस चालक सिग्नलचे पालन करत नाहीत. पीएमएमपीएलने नियुक्त केलेले वॉर्डन लक्ष देत नाहीत. अनेक वाहने विरुद्ध दिशेने येतात, त्याला वॉर्डनकडून प्रतिबंध केला जात नसल्याचे, आयुक्तांच्या निर्दशनास आले. आयुक्त हर्डीकर यांनी पीएमपीएलच्या अधिका-यांना दूरध्वनी करुन याची तक्रार केली. तसेच यापुढे दक्षता घेण्याचे निर्देश दिले. निगडी वाहतूक पोलिसांचा एक कर्मचारी कायमस्वरुपी काळभोरनगर येथे तैनात ठेवण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.