Pimpri: भगवान बाबांनी उपेक्षित, पीडित, वंचितांना दिशा दिली – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र ही संतांची भूमी असून ज्ञानेश्वर हे श्वास तर तुकाराम महाराज निश्वास आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन संत भगवान बाबा यांनी उपेक्षित, पीडित, वंचित समाजाला दिशा देण्याचे महान काम केले आहे. त्यामुळे कोट्यवधी भक्त त्यांना ईश्वरा समान मानतात, असे प्रतिपादन श्री क्षेत्र भगवान गडाचे सचिव,ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केले व्यक्त केले.

संत भगवान बाबा यांची जयंती शुक्रवारी (दि. 31) महाराष्ट्र भरसाजरी करण्यात आली.

‘संताचा महिमा दुर्गम ! शाब्दिकाचे काम नाही येथे’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंग संतांचे कार्य थोर असते माणसे पदाने, पैशाने खूप मोठी होतात. परंतु सुखी केवळ संत कृपेने होतात असे सांगत घोळवे म्हणाले, “माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा अंत असतो आणि संत अमर असतात. कारण, त्यांनी चंदनासारखे झिजून वेदना आणि विवंचना सहन करून समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वाहून घेतलेलं असते. म्हणूनच चंद्र सूर्य असे पर्यंत त्यांची कीर्ती अमर असते”असेही घोळवे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.