Pimpri: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.

काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या निषेध आंदोलनात शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शामला सोनवणे, बिंदू तिवारी, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, मयुर जयस्वाल, मकरध्वज यादव, शहाबुद्दीन शेख, चंद्रशेखर जाधव, वसिम इनामदार, दिलीप पांढरकर, तानाजी काटे, लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, विशाल कसबे, मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, हिरामण खवळे, विश्वनाथ खंडाळे, दिपक जाधव, वैभव शिंदे, दिनकर भालेकर, वैभव किर्वे, माधव पुरी, बी.आर. वाघमारे, मोहन अडसुळ आदी सहभागी झाले होते.

सचिन साठे म्हणाले, महाराजांशी तुलना म्हणजे सूर्याशी तुलना केल्यासारखे आहे. खरा इतिहास दडपून कपोलकल्पित, काल्पनिक इतिहास नवीन पिढीवर लादण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व इतर थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर भाजपा व आरएसएस करीत आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाजपाच्या व आरएसएसच्या विचारांच्या एकाही व्यक्तींचे काहीही योगदान नाही. त्यांच्या विचारांचे कोणीही राष्ट्रपुरुष स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. हा इतिहास दुर्लक्षित व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर स्व:ताची प्रतिमा उंचावण्यासाठी करीत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे. हे भाजपा व आरएसएसचे धोरण आहे

राष्ट्रवादीच्या वतीने चिंचवड येथे करण्यात आलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, वैशाली काळभोर, विशाल वाकडकर, शमिम पठाण आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.