Pimpri: कंन्टेमेंट झोन : झोपडपट्टीमधील नागरिकांच्या कोरोना टेस्टमध्ये वाढ करा, भाजप आमदारांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कंन्टेमेंट झोन, झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची वाढ लक्षात घेता. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. त्याचपध्दतीने असा नावीण्यपुर्ण उपक्रम राबवून कोरोनाच्या टेस्ट मोठ्या संख्येने करावी, अशी सूचना भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनला केली आहे. तसेच अशा 30% परप्रांतीय कामगारांची कारखान्यात राहण्याची सोय करावी. काळजी घेवून (कंटेनमेंट झोन वगळून) इनहाऊस काम करण्यास लघुउद्योगांना परवानगी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात होणारा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात दोनही आमदारांनी आज (बुधवारी)आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत बैठक घेतली. प्रशासनाला विविध सूचना केल्या.

परप्रांतीय मजुर, कामगार व महाराष्ट्रातील जिल्हा परजिल्ह्यामध्ये जाणाऱ्यांची तपासणी मोठ्या संख्येने करावी. या तपासणीसाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. त्याबाबत नियोजन प्रशासनाने करावे. सद्या प्रभाग स्तरावर 32 पथके कार्यरत आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते का यावर लक्ष द्यावे. तसेच कम्युनिटी किचन मध्ये काम करणाऱ्यांची तपासणी करावी. त्यांना सॅनिटायझर, मास्क, साबणचा मुबलक पुरवठा करावा.

सद्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परप्रांतीय कामगार स्थलांतरीत होत आहेत. हे कामगार प्रामुख्याने लघुउद्योगामध्ये काम करत आहेत. ते परत गावाला गेले. तर कामगारांची मोठी कमतरता भासणार आहे. मोठ्या उद्योगांनाही कच्च्या मालाचा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे अशा 30% कामगारांची कारखान्यात राहण्याची सोय करावी. तसेच त्यांचे मेडीकल करुन कोरोना संदर्भातील काळजी घेवून (कंटेनमेंट झोन वगळून) इनहाऊस काम करण्यास लघुउद्योगांना परवानगी द्यावे.

जेणेकरुन कामगारांना रोजगाराची आशा निर्माण होईल. ते स्थलांतर करणार नाहीत. त्याचे नियोजन करावे. तसेच लघुउद्योगांना उद्योग सुरु करण्यास परवानगी देणेचा आदेश काढावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बैठकीला महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक एकनाथ पवार, विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्मंगेश चितळे, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.