Pimpri: दिवसभरात 38 जणांना कोरोनाची बाधा; आंबेगावमधील एकाचा YCMH मध्ये मृत्यू

Corona positive 38 people during the day; One from Ambegaon dies in YCMH

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहाराच्या विविध भागातील 30 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, महापालिका हद्दीबाहेरील आठ जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आंबेगाव येथील 64 वर्षीय वृद्धाचा मध्ये मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत  आहे. संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातला आहे.

शहरातील आनंदनगर, पिंपळेगुरव, बौद्धनगर, सांगवी, भाटनगर, वायसीएमच हॉस्पिटलमधील बॉईज हॉस्टेल, अजंठानगर, गुरुदत्तनगर पिंपरी, लिंकरोड, जनतानगर चिंचवड, रुपीनगर, दत्तनगर वाकड, चिंचवड, आनंदपार्क, निगडी,  खराळवाडी,  दापोडी या परिसरातील 30 जणांना आज कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामध्ये 18 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. तर, महापालिका हद्दीबाहेरील खेड, जुन्नर, डेक्कन, येरवडा, शिवाजीनगर, देहूरोड, चाकण येथील 8  पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

आंबेगाव येथील 64 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे उपचारादरम्यान वायसीएमएच मध्ये मृत्यू झाला आहे.

भोसरी, आनंदनगर, वाकड, बौद्धनगर, पिंपरी, किवळे, भाटनगर, अशोकनगर, दापोडी, कासारवाडी, आंबेगाव, खेड व शिक्रापूर येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या 36 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज शनिवारपर्यंत 708 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 437 कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील 12 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 17 अशा 29 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 251 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 206

# पॉझिटीव्ह रुग्ण – 38

#निगेटीव्ह रुग्ण – 144

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 261

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 579

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 171

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 708

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 251

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  29

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 437

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26460

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 77699

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.