Pimpri Corona News : महापालिकेची 15 लाख लस खरेदीची तयारी; राज्य सरकारने परवानगी द्यावी – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचचवड शहरवासीयांच्या जीविताचा विचार करुन महापालिका 15 लाख कोरोना प्रतिबंधक लस स्वखर्चाने खरेदी करण्यास  तयार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाची त्वरीत परवानगी मिळावी, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी केली.

महापौर ढोरे यांच्या  दालनात आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

या बैठकीस उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, माजी तुषार हिंगे, नगरसदस्य एकनाथ पवार,  शत्रुघ्न काटे, संतोष लोंढे, विलास मडिगेरी, अभिषेक बारणे, शशिकांत कदम, तुषार कामठे, नगरसदस्या ममता गायकवाड, सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

तथापि, लशींच्या अपु-या पुरवठ्यामुळे लसीकरणाची संख्या कमी आहे. त्यामुळे लस उत्पादक कंपनीकडून सदर लस थेट खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधीचा लस खरेदी करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली.

तसेच महापालिका रुग्णालयातील कोरोनाविषयक कामकाज गतिमान होण्याकामी रुग्णालय प्रशासनासोबत नगरसदस्यांची टीम कार्यरत राहणार आहे. कोरोनाच्या तिस-या संभाव्य लाटेचा विचार करुन लहान मुलांना असणारा धोका टाळण्यासाठी त्यांचेकरिता स्वतंत्र हॉस्पिटल तयार करण्यासाठी  महापौरांनी आयुक्तांना निर्देश दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.