Pimpri: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, नागरिकांनो जागृत व्हा, घराबाहेर पडू नका !

एमपीसी न्यूज – जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पिंपरी-चिंचवड शहरात वाढत आहे. पुढील 15 दिवस ‘हाय अलर्ट’ आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे; मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक खबरदारीच्या उपाययोजनांना गांभिर्याने घेत नाहीत. शहरातील गर्दी अद्यापही कमी झालेली दिसत नाही.  त्यामुळे नागरिकांनी जागृत व्हावे, घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनोचा प्रादुर्भाव वाढत आहे. तब्बल 12 ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. प्रशासन त्यादृष्टीने कडक पाऊले उचलत आहे. परंतु, महापालिकेला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. नागरिकांची गर्दी होतान दिसून येत आहे. शहरात नागरिकांची गर्दी अशीच राहिली, तर कोरोना विषाणूला रोखणे हाताबाहेर जाईल, अशी भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. महापालिकेने गर्दी नियंत्रणासाठी आळीपाळीने कर्मचा-यांना कामावार बोलविले आहे. विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

हात स्वच्छ धुणे, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, मास्कचा वापर करणे, गर्दीत जाणे टाळणे, सर्दी, खोकला असल्यास घरातच थांबणे, गरज नसताना घराच्या बाहर पडून नये, अशा सूचना महापालिकेकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, या सूचनांकडे शहरातील नागरिक दुर्लक्ष करताना दिसत आहे. शहरातील गर्दी अद्यापही कमी झालेली दिसत नाही.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील दुकानेही पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्यापही नागरिकांचा मोठा वावर शहरात दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांची होणारी गर्दी धोक्याची सूचना आहे. गर्दीमुळे किंवा नागरिकांच्या शहरातील मोठ्या वावरामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, अशी भिती आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.