Pimpri Corona Update : रविवारी शहरात 228 नवीन रुग्ण; 262 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 18) दिवसभरात 228 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 262 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 62 हजार 207 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 56 हजार 733 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरा बाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 1 हजार 154 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 201 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 953 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 13 आणि खासगी 12 लसीकरण केंद्रांवर 9 हजार 600 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 9 लाख 26 हजार 273 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.