Pimpri Corona Update: शहरात आज 30 नवीन रुग्णांची नोंद; 51 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 30 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 51 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 709 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 218 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 201 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

SJPL Sonigara Jewellers : दसरा दिवाळीनिमित्त SJPL सोनिगरा ज्वेलर्स तर्फे ऑफर्सचा पाऊस

तर, 17 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल (Pimpri Corona Update) आहेत. आज दिवसभरात 898 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 80 हजार 779 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.